आई एकविरा देवी विषयी
मंदीर फार पुरातन असून, मातेची प्राचीन मुर्ती लोप पावल्यामुळे दि.13/03/1998 ला गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मातेच्या नविन मुर्तीची स्थापणा करण्यात आली.पुर्वीपासूनच गावकरयांतर्फे नवराञोत्सव साजरा करण्यात येतो.सन 1960 ते 2003 पावेतो याठिकाणी गावातील पंच मंडळी गावंजी बापुजी पाटील,चिमणाजी अमृता कदम,नारायण बोंपीलवार,आनंदराव ह. कदम धोंडीराव म.कदम दत्ताञय ना.कदम आदी पंचमंडळी या ठिकाणी काम पाहत होते.व संस्थान मध्ये येणा-या भक्तांच्या सोईकरिता सहकार्य करित होते.
अंदाजे 1963 सालच्या महापूरातील ही घटना विषद करीत आहे.
दरवर्षी एक भक्त (पटवे) नवराञामध्ये महागाव येथून येऊन या ठिकाणी नवमीचा नैवद्य दाखवून जात असे,ह्या वर्षीसुद्धा तो आला असता जातेवेळेस जनुना या गावाच्या नाल्यात पुराच्या पाण्याने त्याच्या सोबत असलेली 6 महिन्याची मुलगी वाहून गेली.शोध गेतला असता मिळाली नाही,व राञ झाल्यामुळे गावी गेले.दुसरया दिवशी मुलीचे शव तरी मिळेल या भावनेने ते नदीपाञ पाहत निघाले असता बुडालेल्या जागेपासून 1 कि.मी. अंतरावरलव्हाळीचे वेठ्यास अडकून ती मुलगी सुखरूप जिवंत आढळली.आज ती पुरात वाहिलेली मुलगी आशा पटवे जि.प. शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
याच दरम्यानच्या काळात देवीच्या डोळ्यातून पाणी निघत होते,म्हणून गावकरयांनी त्या ठिकाणी महापंगत केली.आणि त्या दिवशी पासून अखंड दिपप्रज्वलन (नंदादिप) करण्याचे ठरवण्यात आले ते आजतागत चालू आहे.ह्या ठिकाणी दररोज पुजा अर्चा करून मातेला नैवद्य दाखवला जातो.